Tag: Latur

महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेत रक्तदान करून ईद साजरी
महाराष्ट्र

महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेत रक्तदान करून ईद साजरी

लातूर : शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूरच्या वतीने "ईद उल अजहा" निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ईद हा सण कुर्बानी देऊन साजरा न करता आपण रक्तदान करून ईद साजरी करावी असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी महिला विभागाच्या राज्य सह कार्यवाह रुकसना मुल्ला, मिश्र विवाह विभाग कार्यवाह रणजित आचार्य, देवराज लंगोटे यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, अरमान सय्यद, माऊली ब्लड बँकेचे यावस्थापक डॉ सितम सोनवणे, स्टाफ शिवानी गायकवाड , श्रीता गायकवाड यांची सदरील उपक्रमात उपस्थिती होती. ...