Tag: Madhav Rajguru

मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात
मोठी बातमी, राष्ट्रीय

मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात

लोकमराठी न्यूज नेटवर्क इंदोर : मध्यप्रदेश शासनाच्या मराठी साहित्य अकादमी आणि मुक्त संवाद साहित्यिक समिती, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १४ नोव्हेंबर) इंदोर येथे मराठी भाषकांसमोर 'शुद्ध मराठी अभिव्यक्ती' या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सहभागी मराठी भाषकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, अक्षरभारतीचे अध्यक्ष व पुण्यातील मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू यांना पाचारण करण्यात आले होते. महाराष्ट्रापासून दूर अमराठी प्रांतात जिथे हिंदी भाषेचा प्रभाव आहे, अशा वातावरणात राहणाऱ्या मराठी भाषकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहून ही कार्यशाळा त्यांच्यासाठी एकप्रकारची पर्वणीच होती, असे जाणवले. गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ११ वर्षे मुक्त संवादच्या माध्यमातून मराठी बांधवांसाठी अशा प्रकारचे उपक्...

Actions

Selected media actions