मुंबई : महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये 3 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसांचे आत हरकती/ सुचना मागविण्यात आलेल्या आहेत.
या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com वर स्वीकारण्यात येतील.
या अधिसू...