Tag: Maharashtra police

PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
क्राईम

PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : डिलक्स चौकातील एका हॉटेल चालकाने ट्रेडमार्क कायद्याचा भंग केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २२) ट्रेडमार्क कायद्यासह इतर कलमान्वये दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार मार्च २०२४ पासून आतापर्यंत सुरू होता.अखिल निजामुद्दीन अन्सारी (३६ वर्ष) व सलीम निजामुद्दीन अन्सारी (४५ वर्ष, दोघेही रा. मल्हारगड, बि-१६, सेक्टर १२, मोशी प्राधिकरण) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अमर सोमेश्वर लाड (वय ३९, अप्लाइन ओरा, बनकर वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर लाड यांच्या हॉटेल व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या "SSV SHRI SIDDHIVINAYAK VADAPAV" या नावाचा ट्रेडमार्क हा कायदेशीर नोंदणीकृत आहे. मात्र, संशयित आरोपींनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेलसाठी या नावामध्ये केवळ एका अक्षराचा बदल करून "SST SHRI SIDDHIVINAYAK VADAPAV" असे नक्कल नाव ...
लाच प्रकरणी तीन पोलिस बडतर्फ | पोलिस दलात प्रचंड खळबळ
महाराष्ट्र, मोठी बातमी

लाच प्रकरणी तीन पोलिस बडतर्फ | पोलिस दलात प्रचंड खळबळ

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस विविध लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. बडतर्फ कर्मचार्‍यांमध्ये एलसीबीचे सहाय्यक फौजदार मिलिंद केदार, अनिल भगवान महाजन (फैजपूर) व भास्कर नामदेव चव्हाण (मारवड) यांचा समावेश आहे. मिलिंद केदार यांनी पती-पत्नीच्या वादात पतीला मदत करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती, तर अनिल महाजन यांनी दारूच्या अवैध धंदे चालकाकडून सप्टेंबर महिन्यात ५०० रुपयांची लाच घेतली, तसेच भास्कर चव्हाण यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी अमळनेरच्या सरकारी निवासस्थानीच १५ हजारांची लाच घेतल्याने तीनही पोलीस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बड...