Tag: Maharashtra police

लाच प्रकरणी तीन पोलिस बडतर्फ | पोलिस दलात प्रचंड खळबळ
महाराष्ट्र, मोठी बातमी

लाच प्रकरणी तीन पोलिस बडतर्फ | पोलिस दलात प्रचंड खळबळ

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस विविध लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. बडतर्फ कर्मचार्‍यांमध्ये एलसीबीचे सहाय्यक फौजदार मिलिंद केदार, अनिल भगवान महाजन (फैजपूर) व भास्कर नामदेव चव्हाण (मारवड) यांचा समावेश आहे. मिलिंद केदार यांनी पती-पत्नीच्या वादात पतीला मदत करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती, तर अनिल महाजन यांनी दारूच्या अवैध धंदे चालकाकडून सप्टेंबर महिन्यात ५०० रुपयांची लाच घेतली, तसेच भास्कर चव्हाण यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी अमळनेरच्या सरकारी निवासस्थानीच १५ हजारांची लाच घेतल्याने तीनही पोलीस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बड...