Ahilyanagar : अश्विनी नांगरे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरव
कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे गावच्या (ता. कर्जत) सरपंच अश्विनी हरिश्चंद्र नांगरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माहिजळगाव येथील सार्थक मंगल कार्यालयात रविवारी (दि. ७ डिसेंबर) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. खासदार विकास महात्मे होते.
सरपंच अश्विनी नांगरे यांनी गावचे सरपंच पद भूषवित अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. मूलभूत गरजांवर विशेष भर देत प्रथमत: ग्रामीण पाणीपुरवठा अविरत सुरु ठेवण्यासाठी शाश्वत पाणी साठा निर्मिती केली. त्यासोबत अद्ययावत पाणीपुरवठा वितरण प्रणाली निर्माण केली. गावठाण अंतर्गत रस्ते, पिढ्यानं पिढ्या रखडलेले पांदन रस्ते नवनिर्मित केले. १०० पेक्षा अधिक गरजू...










