Tag: Marathi News

PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : काळेवाडी मुख्य रस्त्यावरील बस थांब्यांना शेड नाही. त्यामुळे उन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. वर्षानुवर्षे होत असलेली प्रवाशांची गैरसोय पहाता, तातडीने काळेवाडीत बंसथांबे शेडे उभारावेत. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काळेवाडीत परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे येथून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रवाशांमध्ये महिला, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचीही प्रमाण जास्त आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी बसथांबा शेडची गरज आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्टीलचे शेड न उभारता भलत्याच ठिकाणी ते उभारले आहे. काळेवाडी दवाखान्यासमोर असेच शेड आहे. विशेष असे शेड शहरात अगदी गल्लीत पहायला मिळतात. शेड नसलेले दोन्ही बाजूचे बसथांबे - बी. टी. मेमोरियल शाळेस...
गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन 
पिंपरी चिंचवड

गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन

काळेवाडी : येथील ज्येष्ठ नागरिक गंगाराम दारकू मुरकुटे (वय ७५, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबानगर) यांचे शुक्रवारी (ता. १३) आकस्मित निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतुंड असा परिवार आहे. ते संरक्षण खात्याच्या पिंपरीतील डेअरी फार्म विभागातून निवृत्त झाले होते. अनिल मुरकुटे, सुनिल मुरकुटे व नितेश मुरकुटे यांचे ते वडील होत. ...
युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान 
पिंपरी चिंचवड

युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, ०२ ऑक्टोबर २०२३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी व राष्ट्रीय स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून काळेवाडी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा युवक काँग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान, प्रदेश महासचिव प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आरोग्य निरीक्षक वैभव केंचनगौडा व परिसरातील सफाई कर्मचारी उपस्थित होते. या वेळी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र, शॉल व पुष्प देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम

शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन प्रतिनिधी, २४ सप्टेंबर २०२३ : पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आकुर्डी येथील वर्षा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या वर्षा कदम यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम थीम उभारले होते. त्याचबरोबर काळेवाडी येथील पूनम गोरे यांनी स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी नुकताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या थीमवर सजावट केली होती. स्पर्धेचे तिसरे बक्षीस रहाटणी येथील गीतांजली कुंभार पटकावले. या तिघांनाही आयोजकांच्या वती...
Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना 
सिटिझन जर्नालिस्ट

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

पिंपळे गुरव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमन शिवमुद्रा रथामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून लहान मुले, महिला, पुरुष यावेळी सहभागी झाले होते. मंडळाचे हे ५१ वर्षे असून औंध येथील चंद्रकांत कदम ढोल-ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकी वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंडळाने या वर्षी ' जागर देवीचा ' हा आकर्षक देखावा सादर केला आहे. तसेच यावर्षी मंडळाने अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला असून अनाथ आश्रमातील मुलांना आरतीचा मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदान केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार असून रक्तदात्यास छोटेसे गिफ्ट देणार येणार आहे. असी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोरे, उपाध्यक्ष्य गणेश कुंभार, कार...
PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या
विशेष लेख

PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : विश्वकर्मा योजनेला १७ सप्टेंबर सुरुवात झाली आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट २०२३ रोजी मंजुरी दिली असून योजनेसाठी १३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना २०२३-२०२४ ते या पाच वर्षांसाठी असेल. या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे. शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत. या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार? पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल...
PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’ 
शैक्षणिक

PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या भाटनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. जयश्री गणेश राऊत या विशेष कार्यासाठी महापालिकेकडून 'आदर्श शिक्षिका' ठरल्या आहेत. त्यांच्या सोळा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विदयार्थ्याच्यासर्वागीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले. यात विशेष उपक्रम म्हणजे सध्याच्या काळात संगणक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी मुलांना कोडिंगबाबत मार्गदर्शनावर भर दिला. त्यांचे विद्यार्थी स्क्रॅच या ऑनलाईन कोडिंग फलॅटफॉर्मवर कोडिंग करतात. तसेच त्यांनी विविध सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणारे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या सुप्त गुणाचा विकास घडवून आणण्यासाठी राख्या बनविणे, गणेश मूर्ती बनविणे. पतंग तयार करणे, आकाशकंदिल बनविणे कागदी फुलपाखरे, पणत्या, भेटकार्ड, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कागदी पिशव्या बनविणे आईस्क्रीमच्या काड्यापासून वाॅल हैगिंग, फु...
ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे
पिंपरी चिंचवड

ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे

काळेवाडी, राजवाडा लॉन्स : श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले. पिंपरी : ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यास ज्ञानाच्या तेजाचे चक्र तुमच्या भोवती फिरेल. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक असून मारक नाही. दररोज पाच मिनीटे तरी ज्ञानेश्वरीचे वाचन केले, तरी तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल होईल. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी येथे केले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातंग साहित्य परिषदेच्या वतीने येथील राजवाडा लाॅन्स येथे ज्ञानेश्वरी घरोघरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत हेमंत हरहरे व नरेंद्र पेंडसे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी निवृत्त शिक्षण पर...
PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ताज्या घडामोडी, क्राईम

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला. सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आ...
शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील 
मनोरंजन

शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील

पिंपरी (Lokmarathi News) : शिवसेना (शिंदे गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महिला शहराध्यक्षा पदी शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटीका सरिता साने आदी उपस्थित होते. शैला पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत. त्यामध्ये प्रेमरंग, बिंडी, सर्जा, तांडव सिरिअल दख्खनचा राजा, ऐकविरा आई, वेबसिरिज प्रेमाच्या पलिकडे या प्रमुख चित्रपट व सिरीयल मध्ये कामे केलेल्या असल्यामुळे शैला पाटील यांची पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला शैला पाटील यांचा संघटना बांधण्यासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. ...