Tag: Marathi News

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचा व्यावसायासाठी युवकांना ‘आधार’
पिंपरी चिंचवड

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचा व्यावसायासाठी युवकांना ‘आधार’

व्यवसायात सचोटी अन्‌ प्रामाणिकपणा जपा ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांचे मार्गदर्शन पिंपरी, दि.२२ (लोकमराठी) - कोणताही मोठा व्यवसाय हा एका दिवसात निर्माण होत नाही. व्यवसायाला मोठे करण्यासाठी अपार मेहनत घेवून त्यात सातत्य ठेवावे लागते. व्यावसायिक वाटचालीमध्ये सगळेच दिवस सारखे नसतात. अपयशाने खचून न जाता सचोटीने आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. या संघर्षातूनच यशस्वी उद्योजक निर्माण होत असतो, असे मार्गदर्शन चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांनी केले. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट ही शहरातील नामांकित सेवाभावी संस्था आहे. आरोग्य शिबीर, तरुणांना स्वयंरोजगारासाठी मदत, विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यासाठी मदत असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. आता ट्रस्टच्या वतीने सचिन येडे, स्वाती राऊत, दिलीप खंदारे, अखिल चिंचवडे यांना अंडाभुर्जीची गाडी उपलब्ध कर...
पिंपरी चिंचवड शहर होणार राममय; २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराममंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहर होणार राममय; २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराममंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा

नागरिकांत प्रचंड उत्साह विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन नागरिकांसह विविध संस्था संघटना सहभागी होणार पिंपरी चिंचवड दि.२२ (लोकमराठी) - अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे, यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून पिंपरी चिंचवडकर नागरिक देखील या भव्य दिव्य सोहळ्याचे शहरात विविध कार्यक्रम, उपक्रमांद्वारे जल्लोषात स्वागत करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी दिली आहे. या संदर्भात नुकतीच निगडी प्राधिकरण येथील सावरकर सदन येथे शहरातील विविध सामाजिक ,अध्यात्मिक - सांस्कृतिक, सेवाभावी, विविध ज्ञाती संस्था, सार्वजनिक उत्सव मंडळे,महिला बचत गट, राजकीय पक्ष, संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचा...
आगामी निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती!
पिंपरी चिंचवड

आगामी निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती!

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास संघटनात्मक आढावा बैठकीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन पिंपरी , दि.९ (लोकमराठी) - आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती होईल. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील आणि भाजपा नंबर- १ होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर- १ राहिल्याबद्दल विजेते उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजपा परिवारातील सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, सूज्ञ मतदारांचे आभारही मानले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक योगेश बाचल, माजी सत्...
श्री गणेश सहकारी बँक निवडणूक : शंकर जगताप यांचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल!
पिंपरी चिंचवड

श्री गणेश सहकारी बँक निवडणूक : शंकर जगताप यांचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल!

पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळाची बिनविरोध निवड पिंपरी दि.७ (लोकमराठी)- श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे बँकेचे संस्थापक - संचालक होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने या बँकेच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत. आपल्या ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशा भावना श्री गणेश सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक शंकर जगताप यांनी केले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करता येवू शकतो, हे समजून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे गुरव येथे सन १९९८ साली बँकेची स्थापना केली. बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्...
युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारीपदी चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती

पिंपरी (प्रतिनिधी) , ५ नोव्हेंबर २०२३ - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांची प्रदेश सचिव पदी निवड करत पुणे ग्रामीण विभागाच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेत प्रदेश कार्यकारिणीने चंद्रशेखर जाधव यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू, सहप्रभारी एहसान खान, सहप्रभारी कुमार रोहित आणि प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे आणि विभागाच्या प्रभारींची यादी जाहीर केली. चंद्रशेखर जाधव हे काँग्रेस पक्षाचा तरुण निष्ठावंत चेहरा म्हणून राजकीय क्षेत्रात परिचित आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जाधव यांनी काँग्रेस पक्षाशी नाळ बांधल...
चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती
सामाजिक

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती

चिंचवड, ता. ३१ : भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तीन महिन्यांपासून आयोजित केलेल्या वर्ष वास प्रवचन मालिकेची समाप्ती आश्विन पौर्णिमेला झाली. ही प्रवचन मालिका प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे राबविण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहर महासचिव अशोक सरपाते, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आयुष्यमान एस. एल. वानखेडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास जगताप उपस्थित होते. उल्हास जगताप यांच्या हस्ते १० वी १२ उत्तीर्ण मुलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बौद्धांची विश्व विद्यापीठे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे सचिव निशांत कांबळे, उपाध्यक्ष अल्पणा गोडबोले, खजिनदार आयुष्यमती अनुराधा सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा वार्ड अध्यक्ष किशन बलखंडे, पदाधिकारी किशोर सोनवणे, डॉ. धर्मेंद्र रामटेके, प्रतिमा साळवी,...
PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी
पिंपरी चिंचवड

PCMC : जिजामाता रुग्णालयाच्या डॉ. वैशाली यांचे तात्काळ निलंबन करा; जागृत नागरिक महासंघाची मागणी

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पहाटे 3:40 वाजता रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी गेलेल्या रुग्णाला रुग्णसेवा नाकारणाऱ्या व रुग्णहक्क सनदेचा अवमान करणाऱ्या जिजामाता रुग्णालयाच्या बेजबाबदार व उर्मट डॉक्टर वैशाली यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने डॉ. गोफणे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी ज्या डॉक्टरांना रुग्णसेवा माहीत नाही तसेच रुग्णहक्क सनद माहित नाही, अशा डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. महापालिकेच्या उत्तम रुग्णसेवेच्या लौकिकास काळिमा फासणाऱ्या संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे खडसावून सांगितले.&nbs...
नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने 'नऊ दिवस, नऊ सन्मान' या उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने कु. संस्कृती गोडसे (सामाजिक क्षेत्र), कु. अंकिता नगरकर (वैज्ञानिक क्षेत्र), कु. खुशी मुल्ला (क्रीडा क्षेत्र), मोनिका गोळे-पेंढारकर (लोककला क्षेत्र), अमृता ओंबळे (कला क्षेत्र), प्राजक्ता रुद्रवार (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. जागृती चव्हाण (वैद्यकीय क्षेत्र) आणि रेनी सजी (उद्योजक क्षेत्र) या रणरागिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कारमूर्तींना गौरवपत्र देण्...
PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : काळेवाडी मुख्य रस्त्यावरील बस थांब्यांना शेड नाही. त्यामुळे उन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. वर्षानुवर्षे होत असलेली प्रवाशांची गैरसोय पहाता, तातडीने काळेवाडीत बंसथांबे शेडे उभारावेत. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काळेवाडीत परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे येथून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रवाशांमध्ये महिला, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचीही प्रमाण जास्त आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी बसथांबा शेडची गरज आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्टीलचे शेड न उभारता भलत्याच ठिकाणी ते उभारले आहे. काळेवाडी दवाखान्यासमोर असेच शेड आहे. विशेष असे शेड शहरात अगदी गल्लीत पहायला मिळतात. शेड नसलेले दोन्ही बाजूचे बसथांबे - बी. टी. मेमोरियल शाळेसमोर ...
गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन 
पिंपरी चिंचवड

गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन

काळेवाडी : येथील ज्येष्ठ नागरिक गंगाराम दारकू मुरकुटे (वय ७५, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबानगर) यांचे शुक्रवारी (ता. १३) आकस्मित निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतुंड असा परिवार आहे. ते संरक्षण खात्याच्या पिंपरीतील डेअरी फार्म विभागातून निवृत्त झाले होते. अनिल मुरकुटे, सुनिल मुरकुटे व नितेश मुरकुटे यांचे ते वडील होत. ...