Tag: Marathi News

विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर
सामाजिक

विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक स्व. विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर शाहूनगर येथे स्व विजयराव पाठक स्मृती मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, तसेच माजी नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, शिव शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष संजय तोरखेदे व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर माने यांनी केले. ...
स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक 
पिंपरी चिंचवड, क्रीडा

स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

पिंपरी : "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन (एसआयएच) २०२२" या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (पीसीसीओई) टीम "वॉटर गार्डियन्स"ने "स्मार्ट ऑटोमेशन श्रेणी अंतर्गत" "स्मार्ट शहरांमध्ये पाण्याच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी स्मार्ट सिटी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम" हा लक्षवेधक प्रकल्प सादर करून अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथे आयोजित केलेल्या "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन २०२२" च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक शेट्टी हा "वॉटर गार्डियन्स" टीमचा कॅप्टन होता या टीममध्ये सोहेल शेडबाळे, राशी राठी, रुद्रेश श्रीराव, राधिका डोईजड यांचा समावेश होता. त्यांना प्रा. प्र...
घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड

घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १६ : सुमारे दीड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील युवकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्पाइनसिटी मॉल भोसरी येथे केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले की, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून सरकारमध्ये बसणारी भाजपा व त्याचे नेते यांनी नोकऱ्या तर दिल्या नाहीत. परंतु, आहेत त्या नोकऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील तसेच पिंपरी चिंचवड मधीलयुवकाकडून हिरावून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन
पुणे, सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन

हडपसर : (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले....
एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते....
कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार
पुणे, शैक्षणिक

कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. कवी डॉ. संतोष पवार यांच्या 'नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल' या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. उमेश शिरसट यांना २०१९ या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठ...
एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश
पुणे, क्रीडा

एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश

पुणे : एस.एम. जोशी कॉलेजमधील दिलशाद मुलाणी व गंगासागर भाकड या विद्यार्थिनींनी, मार्गम नृत्य अकादमी मार्फत आयोजित केलेल्या वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनामध्ये सहभाग घेवून विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याबद्दल त्यांना मॉर्गन नृत्य अकादमी मार्फत मेडल व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. एन.एस. गायकवाड साहेब यांनी त्यांचे कौतुक करीत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, कला व क्रीडा क्षेत्रात चांगला नावलौकिक व्हावा यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्याच्या या यशात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाला मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. अ...
भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील इंडस्ट्रीज उद्योजक व कामगार यांनी आम आदमी प्रवेश केला. आपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते व आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल महादेव टाकळे (दिघी), सुरेश बाबू कांबळे (भोसरी), गौतम भगवान इंगळे (काळेवाडी), सुनील सूर्यकांत शिवशरण (भोसरी), पांडुरंग जगन्नाथ राऊत (भोसरी), बालाजी शामराव कांबळे (भोसरी), राहुल झोटिंग कांबळे (मोशी) आदींनी प्रवेश केला. या वेळी आप पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डाॅक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सिता केंद्रे, कमलेश रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंडस्ट्रीज उद्योजक पांडुरंग राऊत, सुरेश कांबळे व आनिल टाकळे यांनी भाजप सरकार वरती नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाणे हे महार...
सर्व पेन्शनधारकांना एका ठिकाणी बोलवून त्यांना संपून टाका
सिटिझन जर्नालिस्ट

सर्व पेन्शनधारकांना एका ठिकाणी बोलवून त्यांना संपून टाका

हा प्रश्न या ठिकाणी कसा मांडावा, कसा लिहावा, फार मोठा प्रश्न पडतो. इपीएस 95 पेन्शन धारकांना 1995 पासून पेन्शन व्यवस्था झाली. त्यामध्ये सरकारने आतापर्यंत एकही रुपयाची वाट दिलेली नाही. गेले कित्येक वर्ष हा लढा चालू आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, आणि दिल्ली न्यायालयाने कामगाराच्या बाजूने निकाल दिलेले आहेत. तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये अद्याप याचा परिपूर्ण निकाल लागत नाही. सहा सात आठ ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर या पेन्शन धारकांचा मोर्चाही निघाला होता. आणि त्यात 16 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला निकाल देण्यात येईल. लवकरात लवकर तुम्हाला पेन्शन देण्यात येईल असे सरकारी माध्यमातून आश्वासन दिल्या गेली होती. परंतु जवळपास चार वर्षे शांततामय चाललेल्या या साखळी उपोषणाकडे लोकप्रतिनिधी फिरकलेही नाही. कारण हे आंदोलन अतिशय शांतता, शिस्तप्रिय आणि साखळी उपोषण म्हणून चाललेले आहे. तसे पाहता आजचा या उ...