घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, ता. १६ : सुमारे दीड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील युवकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्पाइनसिटी मॉल भोसरी येथे केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले की, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून सरकारमध्ये बसणारी भाजपा व त्याचे नेते यांनी नोकऱ्या तर दिल्या नाहीत. परंतु, आहेत त्या नोकऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील तसेच पिंपरी चिंचवड मधीलयुवकाकडून हिरावून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...