Tag: Marathi News

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर

नवनियुक्त महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार लोकमराठी न्यूज नेटवर्क : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी बाबत कॉंग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. सध्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सभासद नोंदणीचा उपक्रम आम्ही राबवित असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात निवडणुकीचे बुथधारकांची यादी यांच्या कामकाजाची मांडणी करण्याबाबत शहरातील विविध भागातील बुथ धारकांची माहिती घेवून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे. उमेदवार मागणीसाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस पक्षाचा कारभार पारदर्शक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात कॉंग्रेसला अनुकूल वातावरण दिसून येत असल्याचा विश्वास पांढरकर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉं...
एड्सच्या जनजागृतीसाठी ‘सक्षम’कडून आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य, पिंपरी चिंचवड

एड्सच्या जनजागृतीसाठी ‘सक्षम’कडून आरोग्य तपासणी शिबिर

पिंपरी : सक्षम फाउंडेशन व असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पिंपरी चिंचवड यांच्यावतीने निगडी- ट्रान्सपोर्टनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी (health checkup) शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात स्थलातरीत कामगारांना एड्सबद्दल माहिती देऊन, जनजागृती (AIDS Awareness Camp) करण्यात आली. या शिबिराचा ७५ जणांनी लाभ घेतला. यामध्ये सक्षम फाउंडेशनमार्फत (Saksham Foundation) या परजिल्ह्यातील कामगारांची एचआयव्ही तपासणी करून औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी कामगारांना फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहल माहुलकर यांनी एड्सबद्दल माहिती देऊन जनजागृती केली. त्यावेळी स्नेहल माहुलकर म्हणाल्या की, ‘‘एचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसच्या मदतीने स्थलारीत कामगार व मालक यांच्या युनियन यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवित आहोत.’’ शिबिर...
पत्रकार दिनानिमित्त ‘महाराष्ट्र प्रेस क्लब’तर्फे निराधारांना अन्नधान्य वाटप
पिंपरी चिंचवड

पत्रकार दिनानिमित्त ‘महाराष्ट्र प्रेस क्लब’तर्फे निराधारांना अन्नधान्य वाटप

पिंपरी : निराधारांची निस्वार्थी सेवा करणाऱ्या पिंपरीतील सावली निवारा ‘केंद्रास महाराष्ट्र प्रेस क्लब’च्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दीनदयाल अंत्योदया योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका डे एनयूएलएम अंतर्गत सावली निवारा केंद्र संचलित रिअल लाईफ रिअल पीपलचे एम. ए. हुसैन यांनी पत्रकार दिनानिमित्त केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी क्लबच्या सदस्यांनी निवारा केंद्रातील निराधारांची विचारपूस करून संस्थेच्या कामाची माहिती घेतली. या वेळी महाराष्ट्र प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा महा ई न्यूजचे अमोल शित्रे, लोकशक्ती न्युजचे विकास शिंदे, लोकमान्य टाईम्सचे संजय शिंदे, डेली महाराष्ट्र न्यूजचे प्रदीप लोखंडे, पुण्यनगरीचे अमोल काकडे, पुढारीचे विजय जगदाळे, निर्भीड सत्...
शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असताना ४० कोटीचे टॅब कोणासाठी?
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असताना ४० कोटीचे टॅब कोणासाठी?

नगरसेवक व अधिकाऱ्यांचा महापालिका तिजोरीवर डल्ला मारण्याचा डाव? रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोना महामारीमुळे सर्वच शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यावेळी महापालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा टॅब या इलेक्ट्रॉनिक वस्तूची गरज होती. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. परंतू, आता नेहमीच्या लुटमार योजनेच्या माध्यमातून २७ हजार टॅब खरेदीचा घाट घातला जात असून त्यासाठी सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च केला जाणार आहे. नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांचा हा डाव नागरिकांच्या लक्षात आला आहे. या खरेदीला शहरातून विरोध होत असून याबाबत जागृत नागरिक महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण...
खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक
पुणे, मोठी बातमी

खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक

सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादीलाच अडकवण्याचा डाव उघड पुणे : औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय 35, रा. ए/31 हजारे सदन, लुंकड हॉस्पिटलजवळ, दापोडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. बेकायदेशीररित्या सावकारी पद्धतीने पैसे देवून अवास्तव पद्धतीने व्याज आकारणी करत तसेच खंडणी मागत ती न दिल्यास सामाजिक बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे स्वप्नील बालवडकर (रा. बालेवाडी) यांनी तक्रार केली होती. त्यानूसार वाळके आणि हजारे यांच्या विरोधात चतु:श्रृंगी ...
CHINCHWAD : गेली १५ वर्षे भोईरनगर बसथांब्यापासून वंचित
पिंपरी चिंचवड

CHINCHWAD : गेली १५ वर्षे भोईरनगर बसथांब्यापासून वंचित

चिंचवड : दळवीनगर आणि भोईरनगर येथील रस्त्यावर कायम वर्दळ असते. भोसरी आणि हिंजवडी येथे आणि कॉलेजला जाण्यासाठी रस्त्यावर कायम गर्दी असते. मात्र, गेली १५ वर्षापासून या ठिकाणी बसथांबा नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हापावसात रस्त्यावर जीव मुठीत घेऊन थांबावे लागेल. त्यामुळे या ठिकाणी बसथांबा उभारण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधारचे शहराध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी केली आहे. याबाबत माधव धनवे पाटील यांनी लोकमराठी न्यूजला माहिती देताना सांगितले की, निगडीच्या दिशेने जाणाऱ्या बसला गेले १५ वर्षे बस स्टॉपच नाही. बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. जेष्ठ नागरिक आणि विध्यार्थी उन्हातान्हात, पावसात बसची वाट पाहत असतात. त्यात येथील रस्ता ६० फुटांपेक्षा जास्त रुंद असल्याने आणि रस्त्याला दुभाजक नसल्याने वाहने भरधाव असतात. त्यामुळे बसची वाट पा...
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डी येथील गुरुदेव नगर भागामध्ये नेत्र तपासणी, शुगर, बीपी तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले की, आपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरे केले जातात. दिल्लीमध्ये शिक्षण,आरोग्य, लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे. जनता महागाईमुळे त्रस्त आहे, कररुपी मिळालेल्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. पाहिजे...
विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली
पिंपरी चिंचवड, सामाजिक

विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली

उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन पिंपरी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी विशेष सहयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत अनेक सवलती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात रविवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शेकडो दिव्यांग मुलांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे सहसचिव मनोजकुमार बोरसे, ऋषाली बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, नंदकिशोर आहेर, समीना काझी, मच्छिन्द्र वीर, किरण ...
रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन

पिंपळे सौदागरमधील सर्व सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्रकल्प राबविण्याचा कुंदा भिसे यांचा संकल्प पिंपरी चिंचवड : झाडांचा जमिनीवर गळालेला पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दुसऱ्या प्लांटचे पिंपळे सौदागरमधील रोझ आयकॉन सोसायटीत आज उद्घाटन करण्यात आले. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी सदर प्लांटला भेट देऊन या प्लांटविषयी माहिती घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, रोझ आयकॉन सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे, पंकज देशमुख, गौरव पाटील, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, मोहित आगरवाल, शशिकांत शर्मा, विकास काटे, दिनेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कंपोस्ट प्रकल्प प्लांटमध्ये झाडांचा पाळापाचोळा, शेणखत, चहापत्ती या नैसर्गिक गोष्टींचेच मिश्रण करून खत तयार केले जाते. याला शासनाचा टेस्टिंग रिपोर्ट देखील मिळाला आहे. हे खत सोसा...
युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन
आरोग्य, पिंपरी चिंचवड

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन

चिंचवड : मंथन फाउंडेशन, रिलीफ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण केंद्र, पुणे, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघवी केशरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिंचवड येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यात आली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्याख्यान दिले. युवक युवती यांना एचआयव्ही म्हणजे काय? एड्स व एचआयव्ही मधील फरक समजून सांगितला. एचआयव्ही कसा होतो, त्याचा इतिहास यावर माहिती दिली. तसेच एचआयव्ही चाचणी सर्व सरकारी रुग्णालय व काही एचआयव्हीवर काम करणाऱ्या संस्था मोफत तपासणी करतात व त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घेतली पाहिजे, ती काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एचआयव्हीबाबत युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. संवेदनशील झाले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षित राहू...