‘लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी’ या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन
हिंजवडी : 'लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी' या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी (ता. १९ डिसेंबर) मारूंजी येथील बुचडे वस्ती येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बुचडे होते. त्यावेळी मारुंजी गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य, गावचे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक ॲड. सुभाष जौंजाळे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी मान्यवरांनी खालीलप्रमाणे आपले मनोगत व्यक्त...