मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.
लोणावळा, दि.२२ (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वेहेरगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले.
धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या आंग्ल दिनांक २१ फेब्रुवारी ते २१ मार्चया महिन्याच्या कालावधीमध्ये वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी, धारकरी, लहान मुले- मुली यांनी रोज एकत्रित येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना दररोज श्रद्धांजली अर्पित केली.
दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना रायगड दर्शन करून आणण्यात आले. या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करून त्यांनी धर्मावर सुंदर असे मार्गदर्शन केले.
यामध्ये सातत्याने महिनाभर वेह...