लोणावळा, दि.१९ (लोकमराठी) – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या तसेच, तळेगाव दाभाडे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोहगडावरील महादेव मंदिरात जि. प.सदस्या अलका धानिवले व गणेश धानिवले यांचे वतीने अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते. शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रकाशराव मिठभाकरे,पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सचिन भोरडे, नागेश मरगळे, गणपत ढाकोळ, रमेश बैकर, पोपट दिघे, शंकर चिव्हे, बाळू ढाकोळ, आदी ग्रामस्थांनी आभार मानले. शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था उद्योजक चंद्रकांत भन्साळी यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, चेतन जोशी, घनश्याम लोणकर, शंकर मोरे, अजय मयेकर, अमोल गोरे, गणेश उंडे,सचिन निंबाळकर,बसप्पा भंडारी, संदीप भालेकर, निलेश अप्पा बोसले, तात्यासाहेब भराटे, अशोक भोसले, सचिन आमले, बजरंग पोटमारे, महेश मोरे, नितीन भुरंगे, सचिन शिंदे आदी कार्यकर्त्यांनी केले होते.
मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो. मुख्य द्वाराला बसविलेला भक्कम सागवानी दरवाजा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो. पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली.
लोहगडावरील शिवमंदिराचा जीर्णोद्धार ज्या मंचाच्या पुढाकाराने झाला, त्यानाच या ठिकाणी महाशिवरात्र साजरी करण्याला अडकाठी करण्याचा प्रयत्न भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात आला. आज आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी होत असताना महाराष्ट्रात मात्र लोहगडावर शिवप्रभूंच्या पालखी मिरवणुकीला बंदी घालण्यात येते हे खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध समस्त शिवभक्तांच्या वतीने संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केला. तसेच, याची दखल महाराष्ट्र शासनाने ताबडतोब घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.