Tag: Modi

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?
सिटिझन जर्नालिस्ट

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?

लोकसभा जरी ३६ राज्यातील ५४४ सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३ राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३ राज्यातच तब्बल ८१ % म्हणजे ४४० खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२ हा जादुई आकडा देखील या १३ राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्या वेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो. आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उत्तरप्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) मध्यप्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७. आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका...