MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण
पुणे : मावळ तालुक्यातील सहा केंद्रातील ५९ शिक्षकांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद या संस्थेमार्फत चालवित असलेल्या स्पोकन इंग्लिश संदर्भात असलेल्या MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी घेण्यात आला.
याप्रसंगी या प्रमाणपत्राचे वितरण पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम बापू कदम, तालुक्याचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज आणि कांचन धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता सुवर्णा तोरणे तसेच विषय तज्ञ सचिन ढोबळे हे उपस्थित होते. या कोर्समध्ये शिक्षकांनी ...