मुस्लिम समाज दफनभूमीची आरक्षित जागा पिंपरी चिंचवड महापालिकेने ताब्यात घ्यावी
पिंपरी, ता २२ : पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्यात मुस्लिम समाजाला काळेवाडी, थेरगाव, वाकड अपवाद सोडता, दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली गेली आहे. मात्र, आरक्षित क्षेत्र भूमाफियांकडून हडप केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे.
इरफान शेख हे लोकमराठी न्यूजशी बोलताना म्हणाले की, आज आपण पाहत आहोत, अनेक भूखंड, मग ते आरक्षित असो अथवा ब्ल्यू लाईन असो, भूमाफियांकडून ते कमी दरामध्ये घेतले जात आहेत. हे भूमाफिया ती जागा जे कामगार वर्ग परराज्यांतून आपली उपजीविका शोधत शहरात आले आहेत, त्यांना विकतात. काही काळात या आरक्षित भूखंडांवर घरे बांधून हे आरक्षण संपविण्याचा डाव केला जातो. अशा परिस्थितीत मुस्लिम समाज दफनभूमीसाठी जे भूखंड आरक्षित करण्यात आले आहे...