जागो मुस्लिम जागो!
संग्रहित छायाचित्र
मुस्लिम समाज म्हणलं की, पवित्र कुराणप्रमाणे आपले सर्व काम आपली दिनचर्या करणारा समाज. दानधर्म, भुकेलेल्याची भुक जाणणारा, तान्हलेल्या व्यक्तीला पाणी पाजणारा, स्वतः भुके राहून दुस-याला पोटभर अन्न देनारा, दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणारा, खोटे बोलू नका, कोणाचाही हक्क हिसकावून घेऊ नका अशी शिकवण देत प्रामाणिकपणे आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारा स्वाभिमानी समाज, म्हणजे मुस्लिम समाज होय.
पण मुस्लिम समाजात मुल्ला मौलवी यांना एक वेगळ स्थान आहे. समाजातील निती मूल्य, समाजाची चालि रिती, विवाह व मृत्यूपश्चात कार्य, यांचे मार्गदर्शन करणा-याचे काम मुल्ला मौलवी करतात. मुस्लिम समाजानुसार ज्याप्रमाणे दिनचर्या कशी असावी अल्लाह सबसे बडा हैं. हे जसे शिकवले जाते. जमातीच्या निमित्ताने अनेकवेळा मुस्लिम लोक एकत्र येतात. मुस्लिम धर्माची निती मूल्य शिकविली जातात.&...