समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे
निरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो
पिंपरी, ता. १२ : न्याय व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायग्रस्त पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे असे आवाहन काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळतो असेही सचिन साठे म्हणाले.
रविवारी (ता. १२ सप्टेंबर) आकुर्डी येथे शहर काँग्रेसच्या लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते.
यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, प्रतिभा कांबळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे; चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते.
यावेळी शहर काँग्रेसच्या लीगल स...