Tag: Nigdi

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड
साहित्य

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड

निगडी, प्राधिकरण (प्रतिनिधी) : जून महिन्यात सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या "स्वानंद संघाचे " बक्षीस वाटप नुकताच कार्यक्रमात संयोजकांकडून जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक- पाऊस नक्षत्रे, द्वितीय क्रमांक -पाऊस पाऊस व तृतीय क्रमांक - पाऊस गाणीया कार्यक्रमास मिळाला. हा कार्यक्रम " पाऊस " या संकल्पनेवर आधारित होता. "पाऊस नक्षत्रे " कार्यक्रमाचे लेखन पुष्पा नगरकर यांनी केले होते. सर्व रोख बक्षिसे पाकिटातून देण्यात आली. त्यावेळी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. पहिले बक्षीस अविनाश पाठक यांचे हस्ते, दुसरे -डॉ.शुभांगी म्हेत्रे यांच्या हस्ते, तिसरे-विदुला आरेकर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्योती कानेटकर, उषा भिसे, सुनिता यन्नुवार, मालती केसकर, उमा इनामदार,रजनी गांधी, स्मिता देशपांडे,माधुरी ओक, शरद यन्नुवार, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, चंद्रशेखर जोशी या ...
निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पिंपरी चिंचवड

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी पिंपरी: निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हे एका महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.सदर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंतच्या रस्त्याचे एका महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यातच या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.खडीवर पु...