Tag: paramedical staff

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. 26 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता, थेरगाव, सांगवी व यमुना नगर रूग्णालायातील कंत्राटी पद्धतीने नेमलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे 350 कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. ठेकेदार त्यांना वेळेवर पगार देत नसून फेब्रुवारीपासून त्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले असून आज जिजामाता रूग्णालयात या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून महापालिका प्रशासानाला जागे केले. दोन दिवसात वेतन देण्याचे ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. असे या ठेकेदाराचे नाव असून 1 ऑक्टोंबर 2021 पासून या ठेकेदाराला महापालिकेने वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी पुरविण्यासाठी नेमले आहे. त...

Actions

Selected media actions