युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत
पिंपरी : सामाजिक कार्यकर्ते व निर्भया महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे हे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३३ मधून इच्छुक आहेत. त्यानिमित्त नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जगताप डेअरीमधील पखवान हॉटेल येथे मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उल्हास कोकणे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याबाबत रहाटणीकरांचे एकमत झाले.
त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह विविध सामाजिक मंडळाचे व लायन्स क्लबचे पदाधिकारी, रहिवासी सोसायटीतील नागरिक व समस्त रहाटणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना उल्हास कोकणे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे पद माझ्याकडे नसताना विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. नागरिक व विशेष करून महिल...