श्री गणेश सहकारी बँक निवडणूक : शंकर जगताप यांचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल!
पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळाची बिनविरोध निवड
पिंपरी दि.७ (लोकमराठी)- श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे बँकेचे संस्थापक - संचालक होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने या बँकेच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत. आपल्या ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशा भावना श्री गणेश सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक शंकर जगताप यांनी केले.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करता येवू शकतो, हे समजून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे गुरव येथे सन १९९८ साली बँकेची स्थापना केली. बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्...