क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?
प्रा. डॉ. किरण मोहिते
"कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने आपणास क्वारंटाईन व्हायला लागेल", असं ऐकल्यावर धडकी भरली. "क्वारंटाईन कस होणार", मी म्हणालो ऍम्ब्युलन्स काहीही पाठवू नका. मी ऍडमिट होण्यासाठी स्वतः येईल. असे सांगून मी क्वारंटाईन होण्यासाठी देहूरोड येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेत गेलो. 'एमजी क्वारंटाईन केंद्र देहूरोड' असं फलकावर लिहलं होत. फलक अर्धा दुमड्डलेला अर्धा आ वासून कसाबिसा उभा होता. भीत-भीत गेट जवळच्या सुरक्षारक्षकाने हाताने इशारा करून खिडकीजवळ जायला सांगितले. खिडकीजवळ गेलो. जवळच्या मित्रांनी मला मास्क लावलेल्या चेहऱ्याकडे पाहून कसंबस ओळखलं. "का रे इथे कसा काय?" "अरे मला क्वारंटाईन व्हायला साघितलं आहे," हे ऐकलंयावर कावऱ्या बावऱ्या नजरेने पाहत. दुसरीकडे तोंड वळविले. क्षणात मान वळवून निघून गेला.
खिडकीतून नर्सने आवाज दिला. आपलं नाव काय? ...