Tag: Rahatni

मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी रहाटणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा मा. आमदार अध्यक्ष ॲाफ इंडीया केमिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे मा. आमदार जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे, केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्ट उपाध्यक्ष विवेक तापकीर, परविंदरसिंग बाध, स्वप्नील जंगम, आशिष परमार, तेजस साळवी, म्हाळप्पा दुधभाते, केतन थोरात, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते....
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी महावृक्ष – कॅप्टन संतोष कोकणे
पिंपरी चिंचवड

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी महावृक्ष – कॅप्टन संतोष कोकणे

रहाटणी : ७१ वर्षापूर्वी साधी टाचणी बनवण्यास पात्र नसलेला देश आज चंद्रमोहीम, मंगळमोहीमद्वारे आकाशाला गवसणी घालत आहे. कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशानेच बनवली असल्यामुळे आपल्या देशाचे जगात नावलौकिक झाले आहे. १९५० ला लावलेले इवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष ठरत आहे” असे प्रतिपादन कॅप्टन संतोष कोकणे यांनी येथे केले. येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॅप्टन संतोष कोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व लेझीमचे आयोजन करण्यात आले होते तसेच परेड करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, संत तुकाराम महाराज शिक्षण संस्थेचे ...