Tag: Rahul Bajaj

संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

पुणे, ता १२ : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (वय ८३) यांचे आज पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे. नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्यावर मागील १५ दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्यानंतर हृदयक्रियेवर परिणाम झाल. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळं त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज समूहाने निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली...

Actions

Selected media actions