Tag: social media

सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई
मोठी बातमी, महाराष्ट्र

सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई

गृहमंत्री देशमुख यांचा समाजकंटकांना इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 (Lokmarathi) : काही विघ्नसंतोषी लोक सोशल मिडीयाचा (समाज माध्यम) दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे. कोरोना साथीमुळे असलेल्या लॉकडाऊन दरम्यान याचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना श्री. देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत. पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध लॉकडाऊनच्या कालावधीत 176 गुन्हे नोंदविले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये द्वेष...
व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित; जाणून घ्या काय आहेत नियम
मोठी बातमी, महाराष्ट्र

व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित; जाणून घ्या काय आहेत नियम

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घेण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई ता. ११ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता शासनाने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे. मार्गदर्शिका प्रकाशितसध्याच्या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात समाजमाध्यमांवर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सअपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज,पोस्ट्स पाठवून व महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अ...

Actions

Selected media actions