Tag: Supriya Sule

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झा...
इंदापूरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण
पुणे, सामाजिक

इंदापूरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथील राधिका सेवा संस्थेमार्फत ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अरविंद विष्णू वाघ यांच्या नेतृत्वाखाली २००५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपर्यंत या संस्थेच्या वतीने सात रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही संस्था इंदापूर शहरात रुग्णवाहिकेची मोफत सेवा पुरविते तर इंदापूर तालुका परिसरात अल्पदरात रुग्णवाहिका उपलब्ध होते. कोविड काळात त्यांचा उपयोग झाला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ...