नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान
पिंपरी : थेरगावच्या तमन्ना शेख हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तमन्ना शेख हिने उत्कृष्ट यश मिळवले. त्यामुळे तीची नायब तहसीलदार पदी निवड झाली.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तमन्ना हिला सन्मानित करण्यात आले. घरची परिस्थिती बिकट, आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणारे शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयॊगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन नायब तहसीलदार पदी निवड झाली. &...