स्वतःचा रक्ताने पहिली सही करून एक लाख सह्यांचे निवेदन देणार - विष्णुपंत भुतेकर
प्रतिनिधी / शंकर सदार
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजाराची मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही रिसोड: - सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पत्रकार व बाजार समितीकडून शेतकरी नेते स्व. शरद जोशी आणि लोकनेते स्व. गोपनाथ मुंढे यांना आदरांजली वाहून त्यांचे फोटो बाजार समितीत लावण्यात आले.
सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे प्रचंड अडचणीत आलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातुन राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपयाची सरसकट मदत द्याव...