Tag: Urulikanchan

Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)
पुणे, मोठी बातमी

Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : उरूळी कांचनजवळील एका घरात भलामोठा साप शिरला, आणि सगळ्यांचीच पाचावर धारणा झाली. आतील सर्वांनी घराबाहेर पळ काढला. मात्र, घरातील खाटेवर असलेल्या वयोवृद्ध आजीजवळ दोन चिमुरड्यांनी आसरा घेतला. अशा घाबरलेल्या परिस्थितीत कोणालाच काही कळेना. त्याचवेळी सर्पमित्र लक्ष्मण पांचाळ यांना फोन करून कळविण्यात आले. लॉकडाऊन असतानाही पांचाळ व त्यांची पत्नी सीमा यांनी चिंचवड येथून 39 किलोमीटरचा प्रवास करत सापाला पकडून जंगलात सोडून दिले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी (ता. 25) दुपारी ही घटना घडली. उरूळी कांचन जवळील महाराजा आकादमी येथे एका घरात सुमारे सात फुट लांबीचा साप शिरला. त्यावेळी सर्वांनीच घरातून धुम ठोकली. मात्र, दोन चिमुरड्यांनी घरातच खाटेवर असलेल्या आजीजवळ जीव मुठीत धरू...