Tag: VBA

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज
राजकारण, मोठी बातमी

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज

हेरंब कुलकर्णी आज मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मनसे ज्या दिवशी स्थापन झाली, तो दिवस अजूनही आठवतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना एक स्वप्न राज ठाकरेंनी दाखवले. खेड्यापाड्यातून शिवाजी पार्कला गाड्या भरून गेल्या होत्या आणि डोळ्यात लकाकी घेऊन खेड्यापाड्यातली मुले गावाकडे आली होती. १३ आमदार निवडून आल्यावर त्या स्वप्नाला धुमारे फुटले आणि पुढे व्हाया मोदी, व्हाया पवार, व्हाया फडणवीस असा आजपर्यंतचा प्रवास समोर आहे. असेच स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवले होते. अशाच खेड्यापाड्यातून तरुणांच्या गाड्या भरून गेल्या होत्या. काँग्रेसमधून ते बाहेर आले याचा अर्थ कॉंग्रेसची सरंजामदारी संस्कृती दूर करतील आणि नवी राजकीय संस्कृती देतील असे वाटले होते पण सारे सहकार सम्राट शिक्षण सम्राट घराणेशाही सम्राट त्यांच्यामागे आले आणि काँग्रेसची भ्रष्ट आवृत्तीच हा पक्ष म्हणून समोर आला. असेच...

Actions

Selected media actions