Tag: Walhekarwadi

इमारत कोसळण्यापूर्वी मनपाचा वाल्हेकरवाडीतील दवाखाना तात्काळ हलवा – नितीन यादव
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

इमारत कोसळण्यापूर्वी मनपाचा वाल्हेकरवाडीतील दवाखाना तात्काळ हलवा – नितीन यादव

पिंपरी : माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार मनपाचा वाल्हेकरवाडी (सेक्टर नंबर 32 निगडी) येथील दवाखाना व व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित व धोकादायक असल्यामुळे तात्काळ पाडण्यात यावी, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे इमारत कोसळण्यापुर्वीच मनपाचा वाल्हेकरवाडी दवाखाना व व्यायामशाळा तात्काळ स्थलांतरित करण्यात यावा. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव यांनी केली आहे. याबाबत यादव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अडतीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ साली बांधलेल्या सदर इमारतीचे २१ एप्रिल २०१६ ला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. सदर ऑडिट मध्ये इमारतीच्या पिलर, बीम, सिमेंट काँक्रीट, स्लॅब, सज्जे व आरसीसी मधील लोखंडी गज यांचे प्रयोगशाळेत भारतीय मानांकनानुसार तप...