पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाचे रविवारी ऑनलाईन उद्घाटन झाले. तेंव्हापासून सर्व शहरवासियांमध्ये मेट्रोतून प्रवास करणे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे कामायनी विद्यालयाच्या ‘विद्यार्थ्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी मोफत मेट्रो सफर घडवली.
पिंपरी मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन आणि परत असा विद्यार्थ्यांनी मेट्रो प्रवास केला. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके व स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी कामायनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली श्री गणेशाची प्रतिमा स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना भेट देण्यात आली. मेट्रो प्रवासाचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता.