पिंपरी : वडगाव शेरी भागातील राहणाऱ्या आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना रुगणांची संख्या ४३ वर पोहचली आहे. शहरामध्ये आजपर्यंत ६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सोमवार (दि.२०) रोजी ४५ संशयित रुग्णांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले होते. नमुने पाठविलेल्याचे रिपोर्ट रात्री उशीरा आले असून त्यात पुण्यामधील एक रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
मागील १३ दिवसात ४२ नविन रुग्णांची भर !
शहरात ८ एप्रिलपासून दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण अढळून येत आहेत.
०८ एप्रिल – ०१ रुग्ण
०९ एप्रिल – ०३ रुग्ण
१० एप्रिल – ०४ रुग्ण
११ एप्रिल – ०२ रुग्ण
१२ एप्रिल – ०५ रुग्ण
१३ एप्रिल – ०२ रुग्ण
१४ एप्रिल – ०६ रुग्ण
१५ एप्रिल – ०४ रुग्ण
१६ एप्रिल – ०४ रुग्ण
१७ एप्रिल – ०२ रुग्ण
१८ एप्रिल – ०७ रुग्ण
१९ एप्रिल – ०१ रुग्ण
२० एप्रिल – ०१ रुग्ण
मागील १३ दिवसात तब्बल ४२ नविन रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान १० मार्चपासून ६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. शहरात कोरोना बाधीत सक्रीय ४३ रुग्ण आहेत. त्यापैकी ३८ जणांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आणि ०६ सक्रीय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील व एका रुग्णावर परभणी येथील रुग्णालयात अशा ०७ जणांवर शहराबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी (दि.१२) थेरगाव भागातील एका पुरुषाचा आणि सोमवार (दि.२०) निगडी भागातील रहिवाशी पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.