घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे

घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे

ज्योत्स्ना राणे

घटस्फोट होण्यास खुप कारणे असु शकतात. बघायला गेले तर भारत हा अशा देशांपैकी एक असा देश आहे. जिथे घटस्फोटांचे प्रमाण खुप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र बदलायला लागल आहे. गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसुन आलेली आहे.

मुलीचे लग्न करताना मुलाचे कर्तृत्व पाहुन नाही तर मुलाच्या वडिलांची संपत्ती पाहुन लग्न केले जाते. जर तो मुलगा व्यसनी निगाला, तर त्या मुलीला कधीच असे वाटत नाही की, आपल्या बापाने आपल्याला डोलीत पाठवीले की आयुष्यभरासाठी तिळडीवर झोपविले.

कोणते कारण असू शकतात घटस्फोट होण्यास?

प्रामाणिक नसणे – विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच नसला तर कुठलेही नाते टिकू शकत नाही.

कम्युनिकेशन्स गॅप – संवाद साधने खुप गरजेचे असते. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा येतो.

महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य – आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. जिथे पुरुष हाच कर्ताधर्ता असतो. पण, आजच्या काळात ही परिस्थिती बदलत चालली असून आता महिला देखील कमवायला लागल्या आहेत. पण जर तुमची पत्नी तुमच्या पेक्षा जास्त कमावती असेल तर आजही आपल्या देशातील पुरुषांना पटत नाही. या कारणाने महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हिसकावून घेतले जाते.

सुनेचा छळ – सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास, काही समाजामध्ये आजही हुंड्याची प्रथा आहे. खुप मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो. अनेकदा मुलीच्या वडिलांनी पुर्ण हुंडा दिला नसेल तर त्या मुलीला वेळप्रसंगी जीव सुध्दा द्यावा लागतो. नाही तर घटस्फोट होतो.

वाढती लोकसंख्या – आताच्या काळात मुलींची संख्या खुप कमी झालेली आहे, म्हणुन वर मुलाला वधु मुलगी मिळणे खुप कठिण झालेले आहे. याच संधीचा फायदा घेऊन काही मुली मुलांना सोशल मिडीयाद्वारे फसवितात आणि लग्नाच्या काही वर्षात घटस्फोट होतात. काही मुली तर मुलांची काही चुक नसताना अपत्य सोडुन घटस्फोट घेतात आणि दुसरे लग्न करतात.

नवरा-बायको मध्ये होणारे वाद – प्रत्येक घरात छोठ्या-मोठ्या कारणावरून वाद होतात. पण, याला घटस्फोट हाच तर पर्याय नाही.

घटस्फोट घ्यायचा कि नाही हे फक्त पती-पत्नी वरती अवलंबून असते. दोघांनी जर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर घटस्फोट होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.