मकरसंक्रांती निमित्त महिलांसाठी खास ‘संक्रांती स्पेशल’ पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण

उन्नती सोशल फाउंडेशन व मानदेशी सोशल फाउंडेशनचा उपक्रम
मकरसंक्रांती निमित्त महिलांसाठी खास 'संक्रांती स्पेशल' पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण

पिंपरी : मकरसंक्राती सणाच्या निमित्ताने उन्नती सोशल फाउंडेशन व मानदेशी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संक्रांती स्पेशल’ पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पिंपळे सौदागरमधील महिलांसाठी व बचत गटांमधील महिलांसाठी या विशेष प्रशिक्षण शिबिराचे शनिवारी (ता. ८ जानेवारी) आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.

या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समाजसेविका शारदाताई मुंढे ,लायन्स क्लबच्या अध्यक्षा अंजुम सय्यद, वर्नराज कुंभारकर, निकिता मॅडम, धनश्री मॅडम यंच्यासह प्रभागातील असंख्य महिला प्रशिक्षनार्थी उपस्थित होत्या.

या शिबिरामध्ये खास मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने बनविण्यात येणाऱ्या पदार्थांचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. यामध्ये विशेषतः विनातेलापासून गुळशेंगदाण्याचे लाडू, तिळाची चिक्की, राजगिऱ्याचे लाडू आदी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मकरसंक्रांती निमित्त महिलांसाठी खास 'संक्रांती स्पेशल' पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना कुंदाताई भिसे म्हणाल्या की, “महिलांना स्वावलंबी उद्योजिका बनविण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या काळात अनेक स्त्रिया या नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असल्याने इच्छा असूनही वेळ नसल्यामुळे सणावाराला कोणतेही पदार्थ बनवू शकत नाही. अशा महिलांना तयार पदार्थ विकत घ्याव्या लागतात. या महिलांना हे पदार्थ पुरविण्याचा व्यवसाय उभा करता यावा व महिलांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”

Actions

Selected media actions