पिंपरी : पिंपरी-चिंचवड खान मालक संघटनेचे दिवंगत अध्यक्ष लक्ष्मण भिमराव भोसले उर्फ तात्या यांना त्यांचे चिरंजीव अमित भोसले यांची स्तुत्य उपक्रमातद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी महापौर हनुमंतराव भोसले यांचे बंधू तसेच विद्यमान नगरसेवक राहुल भोसले यांचे चुलते व युवा नेते अमित भोसले यांचे वडील दिवंगत लक्ष्मण (तात्या) भीमराव भोसले अध्यक्ष मोशी खाणमालक संघटना यांचे ११ सप्टेंबर २०२१ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
तात्यांना गेल्या सहा वर्षापासून यकृताच्या विकाराने ग्रासले होते. त्यांना दिवसाआड डायलिसिसची गरज होती. त्यासाठी तात्यांचे चिरंजीव अमित भोसले यांनी डायलिसीस मशिन आरो प्लांट व आयसीयू बेडची घरीच व्यवस्था केली होती. तात्यांच्या निधनानंतर या सर्व वस्तू ज्यांची किंमत जवळपास बारा लाख रुपये आहे. या सर्व वस्तू अमित भोसले यांनी तात्यांच्या स्मरणार्थ श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचलित पुण्यश्लोक आहिल्यादेवी डायलेसिस अँड डायग्नोस्टिक सेंटर यांना त्यांचे बंधू ऋषिकेश लक्ष्मण भोसले यांच्या हस्ते दान दिले आहेत.
सदरची संस्था ही गोरगरीब गरजू रुग्णांकरिता मोफत डायलेसिस सुविधा पुरविते म्हणूनच या संस्थेची अमित भोसले यांनी निवड केली. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज एकनाथ निकोडे पाटील, विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद सुरेशराव शिंदे, विश्वस्त संदीप दशरथ जगताप, विश्वस्त अशोक पिराजी संकपाळ, विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा, विश्वस्त शिवराज मारुती झगडे व मुख्याधिकारी राजेंद्र माणिकराव जगताप उपस्थित होते.