तुकाराम बीज……विचार तरंग

तुकाराम बीज......विचार तरंग

तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ||

धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ||

आज तुकाराम बीज म्हणजे आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी आपला देह पंच महाभूतांना देऊन टाकला आणि आपला इहलोकातील जीवन प्रवास थांबवला, तो आजचा दिवस. कित्येक जीव जन्म घेतात आणि मरतात, परंतु संत तुकाराम महाराज यांनी जो पुरुषार्थ केला तो जगाला वळण देणारा आहे. जोपर्यंत मनुष्य जमात येथे निवास करणार आहे, तोपर्यंत संत तुकोबा आपल्या अभंगातून आपल्याला जीवनाचे मार्गदर्शन करत राहणार आहेत.

संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण जीवन तसेच त्यांनी लिहिलेले अभंग हे आपल्याला सुखी समृद्ध जीवनाकडे घेऊन जाणारा आहे. आज आपण हा उत्सव साजरा करताना त्यांच्या विचारातून आपलें जीवन आनंदी, पुरुषार्थी, कसे बनेल याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण दिवस येतात आणि जातात मनुष्य हा दुःखी जीवनाकडे वाटचाल करत राहतो. मानवी जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या प्रमुख दोन गोष्टी आहेत. त्या म्हणजे *अपेक्षा, लोभ* , या दोन गोष्टी जर आपण जीवनातून काढून टाकल्या तर आपलें जीवन सुख आणि आनंदी होणार आहे, ते तुकोबाराय आपल्याला शिकवितात.

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा

पुनरपि संसारा येणे नाही

नाव हे शेवंती देऊ भगवंती

पुनरपि संसृती येणे नाही

मन हे तुळशी देऊ हृषीकेशी

पुनरपि जन्मा येणे नाही

तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा

तुझा वास व्हावा वैकुंठासी

संत तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात कि हा जन्म तू मला दिला, या जीवनामध्ये आम्ही परमार्थ करून हे जीवन तुलाच अर्पण केले. यानंतर आता तुझा वास हा सतत आमच्यापाशी म्हणजे वैकुंठामध्ये व्हावा अशी आमची इच्छा आहे.

या प्रकारे संत तुकाराम महाराज यांनी आपल्याला जीवनामध्ये निसर्गाला जिकंलेले आहे. त्यांनी शेवटपर्यंत निसर्गाची सेवा केली. शेवटी आपला देह निसर्गाला देऊन टाकला आणि आपल्याला अभंगरूपी गाथा मागे ठेवली. ही गाथा आजही आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

नागर फौंडेशन हे तुकोबानी दाखविलेल्या मार्गाने कार्य करत आहे. हा मार्ग विद्रोही आहे. व्यवस्थेला प्रश्न करणारा आहे, बुद्धीवादी आहे. यामुळे आपलें जीवन सुखकरक आणि आनंदी कारण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे. यामुळे आजच्या या पवित्र दिवशी तरुण आणि तरुणीनी या मार्गमध्ये येऊन आपल्या जीवनचा सर्व अर्थानी विकास करून घ्यावा अशी नम्र विनंती.

  • रवींद्र हनुमंत गोरे,नागर फौंडेशन, रवळगाव, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर
  • ई-मेल -ravigore24@gmail.com/8788663492