नाशिक दिनांक 6 मार्च 2022 (जिमाका वृत्तसेवा) :राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार असून त्यासाठी शासनमान्य यादी वरील लोककला पथकांममधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दहा शासनमान्य यादीवरील लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यातील तीन लोककला पथकांची निवड करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेली कलापथके
- चाणाक्य कलामंच कलापथक, नाशिक
- नटराज लोककला अकादमी, इगतपुरी
- आनंद तरंग फाउंडेशन, इगतपुरी
आज 7 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील 15 तालुक्यांत ही लोककलेच्या माध्यमातून ही मोहिम राबविली जाणार असून पहिल्या टप्प्यात 11 मार्च पर्यंत 63 कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. प्रत्येक कलापथक 21 कार्यक्रमांचे सादरीकरण करणार असून त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर जिल्ह्यातील याठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.
संस्था व तालुके
- चाणाक्य कलामंच कलापथक, नाशिक (पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर)
- नटराज लोककला अकादमी, इगतपुरी (मालेगाव, बागलाण, मनमाड, सिन्नर, कळवण)
- आनंद तरंग फाउंडेशन, इगतपुरी (नाशिक, निफाड, येवला, नांदगांव, चांदवड)
नारिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.