विप्ला फाउंडेशन व एचएसबीसी टेक्नॉलॉजिस्ट यांच्यातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

विप्ला फाउंडेशन व एचएसबीसी टेक्नॉलॉजिस्ट यांच्यातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : विप्ला फाउंडेशन आणि एच एस बी सी टेक्नॉलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा, कळस, रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घरकाम, बांधकाम मजुर व दगड, वीट, मातीकाम मजुरी करणाऱ्या ५२० कुटुंबाना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रविण कदम, प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रा. दिपक जाधव, प्रा. वैशाली गायकवाड यांचे हस्ते या किटचे वितरण करण्यात आले.

संस्थेच्या प्रा. वैशाली गायकवाड म्हणाल्या की, “उपेक्षित वस्तीतील १८ ते ३० वयोगटातील युवती महिलांना संगणक, व्यवसाय प्रशिक्षणाचे (RETAIL, BPO) कोर्स पुणे आणि पिंपरी येथे सुरू केलेले आहेत. त्यांना किमान उत्पन्नाची हमी देणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, आणि त्यांचे सक्षमीकरण केले जाते.”

प्रा. दिपक जाधव म्हणाले की,” कच्च्या घरात निवास करणाऱ्या दुष्काळी प्रदेशातील भूमिहीन मजुरांना सध्या पुरेसे काम नाही. त्यांची आर्थिक स्थिती महामारीच्या काळापासून खराब झाली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विशेष सहाय्य देत आहोत. त्याच बरोबर केंद्र राज्य सरकारच्या विविध आर्थिक सहाय्याच्या योजनाची माहिती त्यांना दिली जाते. या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.” या कार्यक्रमाचे संयोजन निलेश शिंदे, संतोष जाधव, वैशाली भांडवलकर यांनी केले होते.

Actions

Selected media actions