गिरीश कुबेर यांना का ‘काळं फासलं’? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?

गिरीश कुबेर यांना का 'काळं फासलं'? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?

नाशिक : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : ‘द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातल्या मजकुरावरून याधीच वाद होता. नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तो पुन्हा पुढे आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी या पुस्तकात, संभाजींवर गंभीर आणि आक्षेपार्ह लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं असा आरोप करत, संभाजी ब्रिगेडने त्यांच्या तोंडाला आज नाशिकमध्ये काळं फासलं.

याआधीच गिरीश कुबरे यांच्या या लिखाणाविषयी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड या कुबेर यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. या पुस्तकात वादग्रस्त मजकूर छापून गिरीश कुबेर यांना नेमकं साध्य तरी काय करायचं आहे? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

तसेच अनेक संघटनांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी यापूर्वीच केली होती. आज अखेर संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासून संभाजी महाराजांविषयी केलेल्या लिखाणाबद्दल राग व्यक्त केला आहे.

गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी आणि राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

छत्रपती महाराज यांच्याविषयी नेमकं काय लिहिलंय?

आक्षेपार्ह मुद्दा १) छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे शिवाजी महाराजांसारखी सहनशीलता तसेच परराष्ट्र धोरण नव्हते. शिवाजी महाराजाच्या सैनिकांनी रयतेवर कधीही जुलूम केले नाहीत पण संभाजी महाराजांच्या सैन्याने जुलूम-अत्याचार केले.

आक्षेपार्ह मुद्दा २) शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला यानंतर वारसदार म्हणून गादीवर कब्जा करण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात घडवला. संभाजी महाराजांनी सोयराबाई आणि शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार मारले. या चुकांमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा संभाजीराजांना पुढे भोगावी लागली.

आक्षेपार्ह मुद्दा ३) एवढंच नाही, सत्ता काबीज करण्यासाठी संभाजी महाराज यांनी राणी सोयराबाई यांना ठार मारलं.

आक्षेपार्ह मुद्दा ४) इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जुळणारे कोणते व्यक्तिमत्त्व आहे तर ते बाजीराव पेशवे आहेत.

वरील मुद्दांवर संभाजी ब्रिगेड या संघटनेने आक्षेप घेतला आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात संभाजी महाराजांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे. याविषयी गिरीश कुबेर यांनी माफी मागावी आणि या पुस्तकातला वादग्रस्त मजकूर मागे घ्यावा अशी मागणी यापूर्वीच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड अशा सर्व संघटनांकडून केली जात होती.