विरेंद्र म्हात्रे यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्काराने सन्मानित

विरेंद्र म्हात्रे यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : नेरुळ नोडमधील युवा नेते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्कारने विरेंद्र म्हात्रे यांना गौरविण्यात आले.

देवीचा पाडा पनवेल या ठिकाणी सन्मान सोहळामध्ये युथ फोरम सोशिअल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड, संजीवन म्हात्रे यांच्या हस्ते विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केवल गायकवाड याच कार्यक्रमात लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई करत असलेल्या उल्लेखनीय जनताहितैषी कार्याचीही दखल युथ फोरम सोशिअल असोसिएशन या सामाजिक संस्थेकडून घेण्यात आली. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या सामाजिक संघटनेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.

यावेळी गणेश म्हात्रे, नरेश सुरेश गायकवाड, आकाश देशमुख, मनोज कडू, सुरज यादव, ऋषिकेश शिंदे, प्रमोद मंडळ, रवी जाधव, अमोल गायकवाड, नागेश गायकवाड, महेश गायकवाड यांनी व युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Actions

Selected media actions