मानसशास्त्र विभागाची अनाथ आश्रमाला भेट

मानसशास्त्र विभागाची अनाथ आश्रमाला भेट

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी बचपन बचाव समिती, घरटं अनाथ आश्रमाला भेट दिली. या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांशी संवाद करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अनाथ मुलांच्या आयुष्यामध्ये काही क्षण आनंदाचे देण्याच्या हेतूने या संस्थेला भेट दिली.

या सामाजिक संस्थेविषयी माहीती जाणून घेतली. अनाथ मुलांची दिनचर्या जाणून घेऊन, त्यांच्याशी मनमोकळा संवाद केला. या मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात आले. सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. तसेच या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाने ‘बचपन बचाव समिती, घरटं अनाथ आश्रमाला’ भेट देण्यात आली. यावेळी घरटं अनाथ आश्रमाचे अध्यक्ष, व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. महेश देवकर, डॉ. शिल्पा कुंभार आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.