माता रमाई स्मारकाकरिता धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश – राहुल वडमारे

माता रमाई स्मारकाकरिता धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश - राहुल वडमारे

पिंपरी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत माता रमाई यांच्या पुतळ्यासह त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. या धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या सातत्यपूर्ण मागणीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता माता रमाई यांचे त्याठिकाणी स्मारक होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे यांनी दिली.

संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे यांनी लोकमराठी न्यूजला सांगितले की, याकरिता सलग चार वर्ष पाठपूरावा केल्यानंतर आता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी २१ डिसेंबर २०२१ रोजी आमच्या मागणीप्रमाणे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील जागेत महामाता रमाई यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. महामाता रमाई यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अशी पत्रकार परिषद घेउन जाहीर केले. तब्बल चार वर्षांनंतर आमच्या मागणीला यश आले. महापौर ढोरे यांनी केलेल्या घोषणेचे आम्ही आमच्या धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करित आहोत. परंतु, महापौरांनी केलेल्या घोषणेचे रुपांतर लेखी ठरावात करण्यात यावे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच्या आगोदर महामाता रमाई यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात यावे. अशी भीम संग्राम सामाजिक संघटनेचे व धम्मदिप प्रतिष्ठानच्या वतीने महापौरांची समक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आनंद साळवे, कैलास परदेशी, मिलिंद तायडे, सुभाष विद्यागर, बाळासाहेब कांबळे, उमेश वागमारे, नसरिन शेख, संगिता रोकडे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मागणी करणार आहोत.

असा केला पाठपुरावा

आत्तापर्यंत तीन-तीन दिवसाचे तीन वेळा धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना पाच लेखी निवेदने देण्यात आली, माजी महापौर वैशाली घोडेकर व नितिन काळजे, माजी नगरसेविका गिता मंचरकर यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच पीएमपीएमएल व्यवस्थापक संचालक नयना गुंडे यांना २० एप्रिल २०१८ या रोजी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेचे आयुक्त यांची समक्ष भेट घेउन त्यांच्याशी चर्चा करुन पाठपूरावा करण्यात आला. संबधीत अधिकारी यांना सुध्दा निवेदन देऊन त्यांची समक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली. त्यांनी आम्हाला आंदोलनावेळी लेखी आश्वासन दिले होते. त्याची अमंलबजावणी करण्यात यावी. या करिता वेळोवेळी भेट घेऊन चर्चा केली. अशा प्रकारे धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने व निवेदने देण्यात आली आहेत. त्याचा एक सारखा पाठपूरावा करण्यात आला. असे वडमारे म्हणाले.

आमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

महामाता रमाई यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी या ठिकाणी आंदोलन करित असताना व वर्तमानपत्रात सविस्तर बातमी प्रकाशित होऊन सुद्धा आमच्या बेमुदत धरणे आंदोलनास कोणत्याही प्रकारचा पाठींबा देण्यात आला नाही. उलट आमच्यावर टिका करण्यात आली. ज्यांनी महामाता रमाई यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत, काहीच योगदान नाही. ते काही जण पदाच्या जोरावर पत्रकार परिषद घेऊन, आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे वडमारे म्हणाले.

वडमारे पुढे म्हणाले की, आमचा लढा अजुन संपलेला नाही. जोपर्यंत प्रत्यक्षपणे स्मारकाचे भुमिपुजन हे आचारसंहिता लागण्यापुर्वी होत नाही. व स्मारकाकरिता चाळीस कोटी रुपये मंजुर होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालुच ठेवणार आहोत. तसेच आमची सामाजिक संघटना आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीचे देणे-घेणे नाही. पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी समाजाची चार ते पाच लाख लोकसंख्या आहे. महामाता रमाई यांना अभिवादन करण्याकरिता त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे.