वाकड (लोकमराठी) : कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य जनतेला बसताना आपणास दिसत आहे.
अशा परिस्थितीमध्ये काही स्वयंसेवी संस्था, अनेक सामाजिक कार्यकर्ते आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. याचाच एक भाग म्हणून मार्शल आर्टमध्ये प्राविण्य असलेली मार्शल कॅडिट फोर्स लोकांच्या मदतीला धावून आली.
मार्शल कॅडीट फोर्सचे संचालक गणेश बोऱ्हाडे आणि वाकड येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले, सागर गायकवाड, विकास जगधने, किशोर खंडागळे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब पाटोळे यांनी म्हातोबा नगर, काळाखडकमधील झोपडपट्ट्यांत गरजू लोकांना अत्याआवश्यक अन्नधान्य वाटप केले.
- ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने लावली महापुरुषांच्या प्रतिमेला “आचारसंहीता”
- Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
- KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक