PCMC : झोपडपट्टीत सर्दी, खोकला, तापाची तपासणी करण्यात यावी

PCMC : झोपडपट्टीत सर्दी, खोकला, तापाची तपासणी करण्यात यावी

पिंपरी, (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी भागात सोशल डीस्टॅन्स ठेवणे खूप अवघड असते, गजबजलेला परिसर असल्यामुळे तसेच सार्वजनिक शौचालय, घराला घर चिटकुन असल्यामुळे संसर्ग वाढण्याची खूप भीती असते. म्हणून काही ठराविक डॉक्टरांची टीम पाठवून प्रथम आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.

दिपक चखाले म्हणाले की, दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे थैमान पसरत असताना खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांकडे विशेष लक्ष देऊन झोपडपट्टीत सर्दी, खोकला, ताप आदींची तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच औषध फवारणीही करणे महत्त्वाचे आहे.


PCMC : झोपडपट्टीत सर्दी, खोकला, तापाची तपासणी करण्यात यावी