झुंबरराव चव्हाण यांचे निधन

झुंबरराव चव्हाण यांचे निधन

पुणे : झुंबरराव रायभान चव्हाण (वय ६३, रा. वरवंड, ता. दौड) यांचे शुक्रवारी (ता. ११) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, मुलगा व तीन मुलगी असा परिवार असून त्यांच्या जाण्याने चव्हाण, मोघे, बढेकर व इंगळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक ऊर्फ दिलीप चव्हाण, अलका मोहन मोघे, उषा अतिश बढेकर, लता सुशीलकुमार इंगळे यांचे ते वडील होत. दरम्यान, मंगळवारी (ता. १५) सकाळी दहा वाजता वरवंड येथील विसळी येथे दशक्रिया विधी होणार आहे.

झुंबरराव हे उत्कृष्ट संगितकार होते. तसेच त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.