पिंपरी : आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व लेखक बालाजी कांबळे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे एक सचा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हरपला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
कांबळे हे रहाटणी परिसरात अनेक वर्षा पासून वास्तव्यास होते. त्यांची रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पाषाण वाकड यासह अनेक परिसरात सुरक्षा रक्षक पुरविण्याची एजन्सी आहे. सदा हसत मुखी व सर्वा सोबत मन मिळाऊ असा त्यांचा सोभाव होता. त्यांचा पार्थिवावर मुळज (तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद) या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर काही पुस्तके लिहून तयार आहेत. काही पुस्तकांचे प्रकाशन होणे बाकी आहे.