महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन

महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन

पिंपरी, ता. 8 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 8) केएसबी चौक ते टाटा मोटर्स रस्त्यावर पलोगेथोन अभियान आयोजित करण्यात आले होते. या मोहमेअंतर्गत सुमारे 6.5 टन कचरा संकलन करण्यात आला.

या अभियानात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी व्ही. टी. पाटील आदी सहभागी झाले होते.

महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन

रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, राजेंद्र उज्जैनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई, बिव्हीजी इंडिया व टाटा मोटर्सचे (Tata Motors) अधिकारी यांचेसह सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते.

Actions

Selected media actions